Stay Connected

टिमोचा संकल्प

आजच्या या धावपळीच्या व स्पर्धेच्या जीवनात माणूस यंत्रवत होत चालला आहे. कूटुंब या कोषातच अडकून पडला आहे. सगळेजण करिअर व पैसा यांच्यामागे पळत सुटले आहे. या स्पर्धेतून आपली मुलं,ज्यांच्या घडणवळणाची जबाबदारी आपली आहे,ते सुद्धा सुटले नाहीत. हि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.आपले कुटूंब व आपला समाज,ज्याचे आपण घटक आहोत तो विघटित होत चाललाय असे चित्र निर्माण होत आहे.यासाठी वेळीच जाग्रुत होणे व सावरणे गरजेचे आहे. मुलांच्या सर्वींगीण विकासासाठी बौद्धिक विकासासोबत शारीरिक व मानसिक विकास तेवढाच महत्त्वाचा आहे. किंबहुना एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. समतोल साधला गेला तरच हे नातं खणखणीत होईल. अद्ययावत शैक्षणिक संस्था जोडीला टिव्ही, मोबाईल इंटरनेट, सोशल नेटवर्किंग या सारखी प्रगत माध्यम यामुळे बौद्धिक विकास सतत उंचावत आहे. पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूचे काय? हि बाजू कायम उपेक्षित आहे. मुलांनमध्ये प्रत्यक्ष खेळाबद्दल वाढत असलेली अनास्था, ज्यांच्या समर्थनार्थ बरीच कारणे असतीलही. पण ती तोकडीच आहेत. यासाठी आत्मपरिक्षणाची गरज आहे. सबळ शरीरात तेवढंच कणखर मन असेल तर प्रगतीची घोडदौड डबल होऊ शकते. याला खेळांची ॒ व्यायामाची जोड मिळाली तर. यासाठी गरज आहे कुटूंबाच्या पाठिंब्याची व दृढ निश्चयाची. टिमोच असं मत आहे कि मुलांचं व्यक्तीमत्व मैदानावर ज्या प्रमाणात विकसित होऊ शकते ते अन्य कोठल्याही पाठशाळेत घडू शकतं नाही. हि नीकड लक्षात घेऊन टिमो स्पोर्टस कल्चरला बढावा मीळण्यासाठी प्रयत्न करीत आहे.खेळ हि अशी ऍक्टिव्हिटी आहे कि सर्वींना सोबत घेऊन जात,धर्म,पंथ यांचा भेदभाव न मानता एकत्र बांधू शकते. कारण स्पोर्टसमन स्पीरीटच लोकांच्या विचारांची दिशा व दशा बदलून त्यांना सकारात्मक बनवू शकते. हार जीत जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी खचून न जाता जिद्दीने परत लढण्याचं बळ देत असते.

टिमो स्पोर्टस डॉट कॉम स्पोर्ट्स कल्चरला बढावा देण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी गरज आहे ज्यास्तीतज्यास्त लोकांच्या प्रतीसादाची. स्पोर्टस कल्चर चा उद्देश फक्त स्पोर्टस करीअर नसून खेळासाठी पोषक वातावरण निर्मिती हा होय . मानसिक व शारिरीक तंदुरुस्तीसाठी स्पोर्ट्स कल्चरचा पाठपुरावा करणे जरूरीचे आहे.ध्येय एकच सुदृढ पिढीची निर्मिती व तीही आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आपला प्रतीसाद व काॅमेंट्स अपेक्षित आहे.

धन्यवाद
विजय देशपांडे

Post a Comment